Tuesday, 5 July 2022

स्पर्धा परीक्षेतील अपयशाला कसे सामोरे जावे ?

   मित्रांनो, आपण पाहत असतो की जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यानांच सर्व मान -सन्मान, प्रसिद्धी, समाजात Status या  गोष्टी भेटत असतात.

 पण जे अपयशी होतात किंवा लवकर यश येत नाही त्यांचं काय? नक्की त्यांचं चुकत कुठं? ते मागे का राहतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधन्याचा आपण प्रयत्न करू        

          आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे साधारणतः दोन गट करू शकतो.

 1. जुने ( 4-5) वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी..                                    

 2. नवीन ( साधारणता 1 वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी)      


     दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांच नंतर बघू पण पहिल्या गटातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं नक्की काय चुकत ते पाहू.                     


   1) अभ्यासाविषयी आलेली मरगळ /       साचलेपणा.. 

4-5 वर्षांपासून अभ्यास करत असल्यामुळे अभ्यासात थोडीशी मरगळ किंवा Saturation आलेले असते. त्यामुळे अभ्यास होत नाही. पण मित्रांनो मग ऐन परीक्षेच्या वेळी मग अभ्यास होत नाही आणि परीक्षा नापास होतात. पण ज्यावेळी अभ्यासात Saturation यायला लागत तिथूनच खरी तुमच्या अभ्यासाची सुरुवात व्हायला पाहिजेत.

 Never Give up चा approach इथं जास्त काम करू शकतो. So consistent राहायला पाहिजे..         


 2. अभ्यास करून आलेला Overconfidence/ Attitude..


    जुन्या मुलांमध्ये याच प्रमाण खूप जास्त आहे. मला सर्व येतंय,मी कोणाला कशाला काय विचारत बसू,माझा खूप अभ्यास झालाय , आता फक्त Exam होऊ दे मग बघतोच असा दृष्टिकोन या मुलांचा असतो तशी नवीन मुले Humble असतात. 

आवश्यक व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन ती अभ्यास करतात आणि उत्तीर्णही होतात. त्यामुळेच नवीन मुले उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे..      


3. अभ्यासाची अयोग्य दिशा. -


सुरुवातीपासूनच कोणाकडून मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा योग्य अभ्यास्पद्धती माहित नसल्यामुळे दरवर्षी परीक्षेत त्याच - त्या चुका होतात. आणि निकाल मग यायचा तोच येतो. मग Regret करत बसतात की आपण हे तेव्हाच असं करायला पाहिजे होत, योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होत इ. अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर सुरुवातीपासूनच सावध असणं आवश्यक आहे. 


जुन्या विद्यार्थ्यांकडून अजूनही अशा चुका होत असतील तर वेळीच सावध व्हा आणि योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करा. जिथून मिळेल तिथून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा.मग पुढचा व्यक्ति तुमच्यापेक्षा भले लहान का असेना.त्याचा सन्मान करा. त्याच्याकडून नवीन काहीतरी शिका.    

 तर जुन्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर त्यांनी नक्की विचार करा..                                                       आता प्रश्न राहिला नवीन विद्यार्थ्यांचा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच योग्य मार्गावर राहिले, योग्य Direction ने, योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर त्यांच्या वरील चुका होणार नाहीत आणि त्यांचा यशापर्यंतचा प्रवास सुलभ आणि लवकर होईल.. 

                       

   तरी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा आणि आपला योग्य मार्ग निवडवा अन्यथा शेवट वेगळा सांगायला नकॊ. 


  धन्यवाद 🙏


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...