Tuesday 28 December 2021

चर्चित स्थळ

📌 हैदराबाद

4 फेब्रुवारी 2021 रोजी हैदराबाद या शहराला'ट्री सिटी ऑफ वर्ल्ड' म्हणून मान्यता देण्यात आली.


📌 राउरकेला

4 फेब्रुवारी, 2021 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राउरकेला येथे भारतातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली. या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता 20,000 इतकी असेल. प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या नावाने या स्टेडियमचे नाव देण्यात येणार आहे.


📌 भिंड

मध्य प्रदेशातील भिंड येथील पोलिस मुख्यालयात दरोडेखोरावरती  एक अद्वितीय संग्रहालय स्थापित केले जाणार आहे. या संग्रहालयात फुलन देवी आणि निर्भय गुर्जर या सारख्या दरोडेखोराच्या वस्तूंसह अनेक अनोख्या वस्तू प्रदर्शित केल्या जाणार आहे.


📌 ओडिशा

8 फेब्रुवारी 2021 रोजी ओडिशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने भुवनेश्वरमध्ये कोविड -१ वॉरियर मेमोरियल स्थापन करण्याची घोषणा केली.


📌 अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबार बेटांवर कोविड १९ च्या सक्रिय प्रकरणांची संख्या फेब्रुवारी २०२१ मध्ये शून्य झाल्यामुळे हा देशाचा पहिला कोरोना मुक्त केंद्र शासित प्रदेश ठरला.


📌 लेह

29 डिसेंबर, 2020 रोजी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लेह येथील हवामान केंद्राचे उद्घाटन केले.

3500 मीटर उंचीवर असलेले हे हवामान केंद्र देशातील सर्वात उंच हवामान केंद्र असणार आहे .


📌 लक्षद्वीप

डिसेंबर २०२० मध्ये कृषी मंत्रालयाने केंद्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाला ला सेंद्रिय शेती म्हणून घोषित केले. २०१६ मध्ये सिक्किम राज्याला हा दर्जा मिळाण्यापूर्वी, 100 टक्के सेंद्रिय क्षेत्राचा दर्जा मिळविणारा हा भारतातील पहिला केंद्र शासित प्रदेश आहे


📌 दिल्ली

भारताचे पहिले सार्वजनिक ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग प्लाझा नवी दिल्ली येथे स्थापन. 


📌 चीन

16 एप्रिल 2020 रोजी चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगझूशहरामध्ये  १० लाख जागांच्या क्षमतेसह जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियमचे बांधकाम सुरू 


📌 मेरठ

देशातील पहिलेच प्राणी युद्ध स्मारक बांधले जात आहे.


📌 झरिया

ग्रीन पीस इंडियाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर 


📌 कुशीनगर

देवरियाचे खासदार डॉ. रामपाठी राम त्रिपाठी यांनी भारताच्या पहिल्या तृतीयपंथी साठी प्राथमिक मध्यवर्ती विद्यापीठाची पायाभरणी केली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...