Tuesday, 13 June 2023

बॉम्बे असोसिएशनबद्दल न वाचलेली अशी माहिती:



मुंबई प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख केला जातो. २६ ऑगस्ट १८५२ रोजी Bombay Assocation ही संघटना स्थापन केली. इ.स. १८५२ मध्ये मुंबईत पारसी आणि मुसलमान जमातीत दंगली भडकल्या. त्यामुळे वातावरण संतप्त झाले. या परिस्थितीचा विचार करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती नाना शंकरशेठ यांनी १८ ऑगस्ट १८५२ रोजी आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठित मुंबईकर नागरिकांची एक बैठक घेतली. ही सभा खासगी व गुप्त स्वरूपाची होती. हिंदी जनता आणि ब्रिटिश अधिकारी यांचा या सभेविषयी चुकीचा गृह होऊ नये म्हणून त्यांनी या सभेला प्रसिद्धी दिली नव्हती. सभेला केवळ भारतीयांनाच आमंत्रित केले होते. त्यामुळे इंग्रज अधिकारी संतापले. त्यांनी सरकारविरुद्ध एक मोठा कट शिजतो आहे, अशी अफवा उठविली. २६ ऑगस्ट १८५२ रोजी जाहीर सभा आमंत्रित केली. एल्फिन्स्टन विद्यालयात ही सभा भरली. सभेचे अध्यक्ष जगन्नाथ शंकरशेठ हे होते.

 सभेची उद्दिष्टे 'Telegraph and Courier' मध्ये स्पष्ट करण्यात आली. त्यात म्हटले की, १) डच, जर्मन व इतर युरोपियनांच्या तुलनेत इंग्रज हे चांगले राज्यकर्ते आहेत. २) इंग्रजांनी भारत जिंकला नसता तर इतर कोणत्यातरी परकियांनी तो जिंकून घेतला असता. अशा शब्दांत इंग्रजांची स्तुती करण्यात आली. या सभेला हिंदू, मुस्लिम, ज्यू, पारसी समाजातील नेते उपस्थित होते. बेम्मनजी होरमसजी यांनी प्रास्ताविक केले. या सभेत 'बॉम्बे असोसिएशन' ही संघटना स्थापन झाली.

बॉम्बे असोसिएसनचे पदाधिकारी खालीलप्रमाणे निवडले गेले. 

१) सन्माननीय अध्यक्ष- सर जमशेटजी जीजीभाई,

२) कार्यकारी अध्यक्ष - जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ..

३) उपाध्यक्ष- बोम्मनजी होरमसजी व खंशेंदजी जमशेठजी.

४) सचिव- भाऊ दाजी लाड आणि विनायकराव जगन्नाथजी.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...