मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होय
🍀 मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली.
🌷 पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला.
🍀 इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते.
🌷 १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃
🌺 बाबर 🌺
🍀 जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन उझबेकिस्तानात) आंदिजान शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते.
🌷 उमरशेख मिर्झा पराक्रमी तुर्क सम्राट तैमूरलंग याचा पाचवा वारस होता.
🌷 बाबराच्या आईचे नाव कुल्लघ निगार खानुम होते. बाबरची आई ही मंगोलियन सम्राट चंगीझ खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे शासक होते.
🍀 बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते . किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
🌷🌷🌷🍃🍃🍃🍃🌷🌷🌷🌷🍃🍃🍃
No comments:
Post a Comment