1. 22 डिसेंबर हा दिवस ....... म्हणून साजरा केला जातो.
1. राष्ट्रीय गणित दिवस
2.राष्ट्रीय विज्ञान दिवस
3. राष्ट्रीय हिंदी दिवस
4. राष्ट्रीय संस्कृत दिवस
उत्तर- 1
------------------------------------------------------------
2. खालीलपैकी कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याची बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या एथलेटिक्स कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
1. किदांबी श्रीकांत
2. पी. कश्यप
3. सायना नेहवाल
4. पी.व्ही सिंधू
उत्तर- 4
--------------------------------------------------------
3. चिल्लई कलान संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ. काश्मीरमधील दरवर्षी 21 डिसेंबर ते 29 जानेवारी या कालावधीत हिवाळ्यातील हा सर्वात थंड भाग असतो. संपूर्ण खोऱ्यात किमान तापमान शून्याखाली असताना, स्थानिक भाषेत 'चिल्लई कलान' म्हणून ओळखतात.
ब. हे काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीच्या ४० दिवसांच्या कालावधीला दिलेले स्थानिक नाव आहे.
क. चिल्लई कलान किंवा चिल्ल्या कलान हा एक पर्शियन शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ चाळीस दिवस तीव्र थंडी असा होतो.
1. अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क
उत्तर- 3
----------------------------------------------------------
4. खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूने BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2021 पुरस्कार जिंकला आहे?
1. टॉम डेली
2. एम्मा रादुकानू
3. सानिया मिर्झा
4. नाओमी ओसाका
उत्तर- 2
------------------------------------------------------------
5. भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने खालीलपैकी कोणासोबत करार केला आहे?
1. विविध भारती
2. दूरदर्शन
3. प्रसार भारती
4. आकाशवाणी
उत्तर- 3
------------------------------------------------------------
6. 'नीना गुप्ता' संदर्भात खालीलपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत?
अ. नीना गुप्ता रामानुजन पुरस्कार जिंकणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला आहे.
ब. इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूटमधील गणिततज्ञ आहेत.
क. तरुण गणितज्ञांसाठी DST-ICTP-IMU रामानुजन पुरस्कार दिला जातो.
1. अ, ब, क
2. ब, क
3. अ, क
4. अ, ब
उत्तर-1
------------------------------------------------------------
7. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महानदीवरील 'टी-सेतू' या सर्वात लांब पुलाचे उद्घाटन केले?
1) ओडिशा
2) आसाम
3) पश्चिम बंगाल
4) महाराष्ट्र
उत्तर- 1
------------------------------------------------------------
8. ........100% लसीकरनातील दोन्ही डोस पूर्ण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे.
1. लेह लडाख
2. लक्षद्वीप
3. पॉंडेचेरी
4. अंदमान आणि निकोबार
उत्तर- 4
------------------------------------------------------------
9. GIS-आधारित 'स्वयंचलित पाणी पुरवठा प्रणाली संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा
अ. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने ईछावणी प्रकल्पांतर्गत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरिकांसाठी भारतातील पहिली भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित 'स्वयंचलित पाणी पुरवठा प्रणाली' लाँच केली.
ब. या प्रणालीसाठीचे मॉड्यूल भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉरमॅटिक्स (BISAG) ने संरक्षण सचिव आणि संरक्षण संपत्तीचे महासंचालक (DGDE), दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले आहे.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. एकही नाही
उत्तर- 1
Correct ans- केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्रालयाने.......
------------------------------------------------------------
10. नेतृत्व प्रतिबद्धता 2021 साठी UN महिला पुरस्कार कोणी जिंकला आहे?
1. दिव्या हेगडे
2. रितू कुमार
3. आदिती गुप्ता
4. वाणी कोला
उत्तर- 1
================================
No comments:
Post a Comment