🔰ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून पूर्वकाळजी घेण्याचे तसंच गरज पडल्यास निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.
🔰दशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस्मसपासून उत्तर प्रदेशात याची अमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशात २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.
🔰याशिवाय योगी आदित्यनाथ सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधनं आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये करोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करावं लागेल असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नाईट कर्फ्यू लागल्यानंतर लोकांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर फिरण्याची मुभा नसेल.
No comments:
Post a Comment