Thursday, 23 December 2021

वासुदेव बळवंत फडके

🖍वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म 4 नाेव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला.

🖍फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.

🖍1857 च्या उठावानंतर भारतात इंग्रजांविरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो फडके यांचा होता.

🖍 पेशवाईच्या काळात पनवेल जवळील कर्नाळ जिल्ह्याची किल्लेदारी ही फडक्यांच्या घराण्यात होती.
त्यांना सुभेदार फडके म्हणून देखील ओळखले जात असे.

🖍उदरनिर्वाहासाठी वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली व नंतर ते लष्करी खात्यात नोकरीस लागले.

🖍 इंग्रजांकडून त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असे व त्यांच्या या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस देखील जाता आले नाही.

🖍फडकेंवर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता.

🖍1873 मध्येफडकेंनी स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ घेतली तसेच समाजात समानता, ऐक्य व
समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धीनी संस्था सुरू केली.

🖍 पुणे येथे फडकेंने 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन ही शाळा स्थापन करुन स्वदेशीचा पुरस्कार देखील केला.

🖍फडके हे दत्त उपासक होते व त्यांनी दत्तमाहात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला
होता.

🖍शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज भारतातून जाणार नाहीत असे त्यांना वाटत असल्यामुळे इंग्रजांविरोधी उठावास त्यांनी सुरूवात केली व इंग्रजांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश घेवून जन जागृती करत ते गावोगावी फिरू लागले.

🖍 दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर त्यांनी पहिला दरोडा घातला यामध्ये त्यांना केवळ 3,000 रुपये मिळाले.

🖍 सरकारी खजिन्यास कडक बंदोबस्त असल्यामुळे सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंताची व सावकारांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी लोणी, खेड, जेजुरी जवळील वाल्हे, पुरंदर, हुरणे, सोलापूर, वरसगाव येथे दरोडा टाकून लुटमार केली. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेवून आसपासचा प्रदेश देखील लुटला.

🖍 अखेर दिवसेंदिवस या लुटीच्या बातमीने हादरुन पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनिअल याने फडकेंचा शोध घेत असता शुक्रवार पेठेत पोचला व त्याठिकाणी त्यास तलवारी, बंदुका मिळाल्या व डॅनीअलने लगेलच फडकेंवर अटक वॉरंट काढले व यानुसार फडकेंना पकडण्यासाठी मुंबई सरकारने 4,000 रुपयांचे रोख बक्षिस घोषित केले.

🖍 यावर प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी जाहीर केले की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयांची बक्षिस दिले जाईल. परंतु फडकेंचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही व रामोशांनी देखील त्यांची साथ सोडली होती.

🖍 अखेर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बाैध्द विहारमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली होती.

🖍 न्या. अल्फ्रेड केसर यांच्या समोर सदरील खटला सुरू झाला व त्यांनी सत्र न्या. न्युनहॅमकडे हा खटला वर्ग केला. फडकेंचे वकीलपत्र ग.वा. जोशींनी घेतले होते व उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते.

🖍 फडके यांच्या बचावासाठी जनतेने उस्ताहाने निधीदेखील गोळा केला परंतू कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

🖍 अखेर जानेवारी 1880 मध्ये त्यांची तेहरान बोटीने एडण येथे रवानगी करण्यात आली व तेथेच 17 फेब्रुवारी 1883 रोजी तेथील इंग्रजांच्या होणारया छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले.

🖍 "  देशप्रेमाने ओथंबलेला हिमलया सारखा उत्तुंग महापुरुष " असा फडकेंचा गौरव बंगालमध्ये प्रसिध्ह अमृतबाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर एका पत्रात केला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...