Monday, 20 December 2021

भारतात अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा यांच्या निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला मंजुरी


🔰भारताला इलेक्ट्रॉनिक यंत्रणा संरेखन आणि निर्मिती क्षेत्रात एक जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी देशात शाश्वत अर्धवाहक चकत्या (सेमीकंडक्टर चिप) आणि दृश्यपडदा (डीस्प्ले) यांच्या निर्मिती परीसंस्थेच्या विकासासाठी समावेशक कार्यक्रमाला मंजुरी दिली.


🔰अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा यांचे उत्पादन आणि संरेखन या क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल असे अनुदान पॅकेज देऊन, इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्रात नवे युग सुरु करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु केला जाईल.


🔴ठळक बाबी...


🔰कार्यक्रमामुळे धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक स्वावलंबित्व या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रांमध्ये भारताला तंत्रज्ञानविषयक आघाडी घेण्याचा मार्ग सुकर होईल.


🔰सिलिकॉन अर्धवाहक फॅब्स, दृश्यपडदा फॅब्स, संयुक्त अर्धवाहक चकत्या/ सिलिकॉन फोटॉनिक्स/ संवेदक (MEMS सह) फॅब्स, अर्धवाहक पॅकेजिंग (ATMP/OSAT), अर्धवाहक संरेखन यामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या/ उद्योग संघ यांना आकर्षक मदत निधीचे पाठबळ पुरविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment