Tuesday, 7 December 2021

जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा - सिंधूला उपविजेतेपद.

🔰भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला कोरियाच्या आन सेयंगने सरळ गेममध्ये पराभूत केले.


🔰टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत १९ वर्षीय सेयंगने तिचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. ४० मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूला सेयंगचा बचाव भेदता आला नाही किंवा तिने केलेल्या वेगवान खेळाचे उत्तरही देता आले नाही. सिंधूची सरळ गेममध्ये पराभूत होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली.


🔰सिंधूने वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. यंदा अंतिम लढतीत तिला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ती ०-४ अशी मागे पडली. सेयंगने वेगवान पद्धतीने खेळ करत १६-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सेयंगला हा गेम २१-१६ असा जिंकण्यात यश आले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...