Saturday 11 December 2021

मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन कुराणातील आयातींचं पठण करून झाले?; ‘त्या’ व्हायरल फोटोचं सत्य काय


🔰नाशिक येथे पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काही दिवसांपूर्वीच झाला. यावेळी आयोजकांपासून विरोधकांपर्यंत सुरु असलेले वाद पाहायला मिळाले. भाजपाने संमेलनात सावरकरांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोप करत आयोजकांवर टीका केली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.


🔰तयानंतर आता महाराष्ट्रात पार पडलेल्या साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणमधील आयातींच्या पठणाने झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यासंदर्भात एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये  खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड दिसत आहेत.


🔰अल्ट न्यूजच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील शंकराचार्य गुरुकुलच्या अध्यक्षा अर्पिता चॅटर्जी यांनीही हा फोटो शेअर करून हा दावा केला आहे. या ट्विटला चार हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत. यासोबत अनेकांनी हा फोटो शेअर करून महाराष्ट्र साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणातील आयतींच्या पठणाने झाली, असेच म्हटले आहे.


No comments:

Post a Comment