Tuesday, 14 December 2021

धर्माधारित फाळणी ही ऐतिहासिक चूक.



🔰भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद्धही भारत जिंकेल. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होताना भारताचे धर्माच्या नावावर झालेले विभाजन ही ‘ऐतिहासिक चूक’ होती हे १९७१च्या युद्धाने दाखवून दिले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.


🔰दहशतवादाला प्रोत्साहन देऊन आणि इतर भारतविरोधी कारवाया करून पाकिस्तान भारताचे तुकडे करू इच्छितो, असे भारताने १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय पर्वाच्या’ (सुवर्णमहोत्सवी समारंभ) उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.


🔰भारताच्या सशस्त्र दलांनी १९७१च्या युद्धात पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीला मिळवले आणि सध्या ते दहशतवादाचा धोका मुळापासून नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकलो आणि आम्ही अप्रत्यक्ष युद्धही जिंकू अशी मी हमी देऊ शकतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...