Sunday 26 December 2021

32 वर्षांनंतर ‘INS खुकरी’ जहाज सेवेतून निवृत्त



🔰भारतीय नौसेनेतील INS खुकरी ही स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्र युद्धनौका देशसेवेच्या गौरवास्पद 32 वर्षांनंतर 23 डिसेंबर 2021 रोजी सेवेतून निवृत्त झाली. 


🔰विशाखापट्टणम येथे झालेल्या एका कार्यक्रमात ‘खुकरी’ जहाजावरचा राष्ट्रीय ध्वज, नौदल एनसाईन आणि डीकमिशनिंग पॅनेट सूर्यास्ताला खाली झुकवून निरोप देण्यात आला. 


🌼ठळक बाबी 


🔰23 ऑगस्ट 1989 रोजी मझगाव गोदीने ‘खुकरी’ जहाजाची बांधणी केली होती. पश्चिम आणि पूर्व ताफ्याचा जहाज भाग होते. मुंबईत या नौकेचा सेवेत समावेश केला. कमांडर संजीव भसीन हे जहाजाचे पहिले कमांडिंग अधिकारी होते.

आपल्या सेवा काळात INS खुकरी जहाजावर 28 कमांडिंग अधिकारी होते आणि जहाजाने 6,44,897 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे.

भारतीय लष्कराच्या गोरखा ब्रिगेडशी ही नौका संलग्न होती.

No comments:

Post a Comment