Sunday, 26 December 2021

‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021



‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, परराष्ट्र मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (DARPG) याच्या पुढाकाराने 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2021 या काळात देशात ‘सुशासन सप्ताह’ पाळण्यात येत आहे.


सुशासन सप्ताहानिमित्त उत्तम प्रशासनाच्या कार्यपद्धती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी 'प्रशासन गांव की ओर' अर्थात 'प्रशासन चालले गावांकडे' या मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणु-ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 20 डिसेंबर 2021 रोजी झाला.


'प्रशासन गांव की ओर' या मोहिमेद्वारे, सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सेवा प्रदान करण्यात सुधारणा करण्यासाठी सर्व जिल्हे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक राष्ट्रीय चळवळ चालवली जाणार आहे.


सातशेपेक्षा अधिक जिल्हाधिकारी 'प्रशासन गांव की ओर' उपक्रमात सहभागी होतील आणि आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात तहसील / पंचायत समितीच्या मुख्यालयांना भेटी देतील. लोकांच्या तक्रारींचे वेळेवर निवारण व्हावे आणि त्यांना सेवा प्रदान करण्याची पद्धत अधिक सुधारावी, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment