Wednesday, 17 November 2021

MPSC मार्फत लवकरच 15,511 पदांची भरती होणार!


👨🏻‍💼 राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यासह काही विभागांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा या आयोगामार्फत एकूण 15511 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामधील एकूण 7168 पदांचे मागणीपत्र राज्य शासनामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झाले आहे.

👉 राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इतर विविध विभागात एकूण 15511 पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये गट-अ वर्गात 4417, गट-ब वर्गात 8031 तसेच गट-क वर्गात 3063 पदे असणार आहेत.

📄 राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 7168 पदांचे मागणीपत्र मिळाले आहे. त्यामध्ये गट अ - 2827 पदे, गट ब - 2641 पदे, गट क - 1700 पदे असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

📍 विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असून अनेक कामांचा पाठपुरावा मी स्वतः करत आहे. 7168 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच लवकर एमपीएससी विद्यार्थ्यांना एक वर्षाची संधी वाढवून दिल्याचे परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment