२७ नोव्हेंबर २०२१

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती.


🎻भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. यासंदर्भातील माहिती भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विटरवरुन दिली आहे.


🎻सभाजीराजेंनी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भातील एक ट्विट केलं असून राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय.


🎻सभाजीराजेंनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


🎻तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असंही म्हटलंय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...