Friday 12 November 2021

ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींहून अधिक जीएसटी संकलन



🔰सणोत्सवाच्या काळातील खरेदी हंगामाचा सुपरिणाम दिसू लागला असून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचा वेग कायम आहे. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये या करापोटी १.३० लाख कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला.


🔰 कद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जीएसटी करप्रणाली १ जुलै २०१७ पासून लागू झाल्यापासूनचे हे दुसरे सर्वोच्च कर संकलन आहे. चालू वर्षात एप्रिलमध्ये सर्वाधिक १.४१ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. सणोत्सवाचा काळ असल्याने देशभर वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे. त्याचेच प्रतिबिंब वाढलेल्या कर महसुलात उमटले आहे. वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने चारचाकी वाहने आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता तर कर महसुलात आणखी भर पडली असती. 


🔰सरकारचे महसुली उत्पन्न प्रत्येक महिन्याला वाढत असून सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढीव जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते.


🔰त प्रमाण ऑक्टोबरमध्ये १,३०,१२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा जीएसटीत २४ टक्के वाढ झाली. ऑक्टोबरमधील  महसुलात केंद्रीय  वाटा २३,८६१ कोटी रुपये, तर राज्यांनी वसूल केलेल्या जीएसटीचा वाटा ३०,४२१ कोटी रु पये आहे.

No comments:

Post a Comment