1) राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात ?
अ) कलम – 73 ब) कलम – 74
क) कलम – 76 ड) कलम – 78
1) अ, ब आणि क 2) ब, क आणि ड
3) अ, ब आणि ड 4) ब आणि ड केवळ
उत्तर :- 4
12) भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते इंग्लंडमध्ये मात्र :
अ) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते.
ब) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण “राजा चुक करू शकत नाही.”
वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
1) अ 2) ब
3) दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 3
13) भारताच्या महान्यायवादींसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.
ब) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) अ आणि ब 2) फक्त ब
3) ब आणि क 4) अ आणि क
उत्तर :- 1
14) खालील बाबींचा विचार करा.
अ) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.
1) अ व ब दोन्ही बरोबर आहेत.
2) ब बरोबर व अ चूक आहे.
3) अ बरोबर व ब चूक आहे.
4) अ व ब दोन्ही चूक आहेत.
उत्तर :- 2
15) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणा-या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ........................ आहे.
1) 288 2) 19
3) 48 4) 67
उत्तर :- 4
16) भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?
1) विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल
2) राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा
3) विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल
4) राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभा
उत्तर :- 2
17) राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ........... अँग्लो इंडियन सदस्य नेमले जात होते.
1) तीन 2) दोन
3) चार 4) पाच
उत्तर :- 2
18) सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?
1) व्दिगृही 2) एकगृही
3) बहुगृही 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
19) संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर ..................... महिन्यांपेक्षा कमी असावे.
1) दोन 2) तीन
3) चार 4) सहा
उत्तर :- 4
20) दोन्ही विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा :
अ) 1976 सालच्या एक घटनादुरुस्तीव्दारे मतदार संघांची पुनर्रचना 2001 च्या जणगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली.
ब) परिसिमन आयोगाद्वारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदार संघामध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या.
1) दोन्ही विधाने चुकीची आहेत.
2) विधान (अ) चुकीचे आहे.
3) विधान (ब) चुकीचे आहे.
4) दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि (ब) हा (अ) चा परिणाम आहे.
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment