Wednesday 26 June 2024

राज्यघटना -



1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?


१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.


वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 


या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?


१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...