Tuesday, 23 November 2021

भारताची ‘मिसाईल पॉवर’

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला. 


▪️पथ्वी-1


सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.


▪️अग्नि-1


अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.


▪️आकाश


जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.


▪️नाग


रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो. 


▪️तरिशूल


जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.


▪️अग्नि 2


एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.


▪️पथ्वी 3


नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.


▪️बराह्मोस


भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.


▪️सागरिका


समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.


▪️धनुष


पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


▪️अग्नि-3


अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.


▪️अग्नि-4


पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.


▪️अग्नि-5


भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.


▪️निर्भया


जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.


▪️परहार


जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...