२० नोव्हेंबर २०२१

पुढील दशकभरात भारतात तीन विश्वचषक



🔰भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.


🔰आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. भारतात २०२९ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल.


🔰तसेच पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळेल.


🔰पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता. तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरीत्या २०२४ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...