Saturday, 27 November 2021

लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होत संभाव्य विनाश होऊ नये यासाठी नासाची ‘चाचणी’ मोहिम.


✔️असा एक अंदाज वर्तवला जातो की सुमारे सहा ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एका मोठा लघुग्रह आदळला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट झाली, विशेषतः त्यावेळी पृथ्वीवर मुक्त संचार करणारे डायनॉसोरही पुर्णपणे नष्ट झाले.


✔️शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवर लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह हे अनेकदा आदळले आहेत आणि यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. मग आत्ताच्या काळात एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर ? अशी लघुग्रहाची टक्कर टाळणे शक्य आहे का ? तेव्हा भविष्यात होऊ घातलेली लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी नासाने मोहिम हाती घेतली आहे.


✔️नासा सध्या DART-Double Asteroid Redirection Test या मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीला धोका नसलेले पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन जवळुन प्रवास करणाऱ्या अनेक लघुहग्रहांपैकी एका लघुग्रहावर नासा एक यान अत्यंत वेगाने धडकवणार आहे.


✔️या माध्यमातून त्या लघुग्रहाची दिशा बदलवता येते का, लघुग्रहावर काय परिणाम होतो असा अभ्यास करणार आहे. या मोहिमेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग भविष्यात पृथ्वीवर आदळणाऱ्या संभाव्य लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...