Friday 12 November 2021

राष्ट्रपतींच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण.

🏆 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात करण्यात आलं.

🏆 जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, शिल्पकार सुदर्शन साहो, इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक मौलाना वहिदुद्दीन खान यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.

🏆 तसंच प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांना मृत्यू पश्चात पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

🏆 माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, गायिका के एस चित्रा, प्रसिद्ध  कवी चंद्रशेखर कंबारा, निवृत्त सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्र यांना आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, माजी केद्रीयमंत्री रामविलास पासवान यांना मृत्यू पश्चात पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🏆 समाज सेविका सिंधूताई सपकाळ, संगीतकार बॉम्बे जयश्री, ब्रीटीश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले.

🏆 गोव्याच्या माजी मुख्यमंत्री मृदुला सिन्हा यांना मृत्यू पश्चात हा पुरस्कार देण्यात आला.

🏆 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं यंदा ७ पद्मविभुषण, १० पद्मभुषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

No comments:

Post a Comment