Thursday, 8 December 2022

रिझर्व बँक ऑफ इंडिया ची कार्ये


1) चलन विषयक धोरण अंमलबजावणी – चलन विषयक धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर टाकण्यात आली आहे. रिझर्व बँक दर सहा महिन्यांनी चलनविषयक धोरण अहवाल प्रकाशित करते, या अहवालात चलनवाढीचे स्त्रोत, पुढील 6 महिने ते 18 महिन्यातील चलनवाढीच्या शक्‍यता या बाबी स्पष्ट केलेल्या असतात .


2) चलन प्रचालन – एक रुपयाची नोट सोडून इतर सर्व नोटा छापण्याचे काम रिझर्व बॅंक करते सर्व नाणी व सर्व नोटांचे प्रचालनाचे (म्हणजे व्यवहारात आणण्याचे) काम रिझर्व बँक करते.


3) सरकारची बँक – सरकारच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी रिझर्व बँकेवरती असते. रिझर्व बँक कायदा 1934 नुसार केंद्र सरकारचे पैसा देणे विनिमय बँकिंग व्यवहार आणि कर्ज याबाबत विश्वसनीय म्हणून रिझर्व बॅंक काम पाहते. करार केल्यास राज्य सरकार यांसाठी बँकर आणि कर्जाची व्यवस्थापक म्हणून रिझर्व बँक काम पाहू शकते.

 

4) बँकांची बँक – देशातील सर्व बँकांचे खाते रिझर्व बँकेत असते. या खात्यामार्फत रिझर्व बँक बँकांना बँकिंग सुविधा पुरवते. रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते.


5) निरसन गृह –

रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते. आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन गृह होय. प्रत्येक बँकेकडे इतर बँकाकडून चेक, डिमांड ड्राफ्ट इत्यादी बाबी वटवण्यात येत असतात. तसेच इतर बँकांचे त्या बँके वरती चेक, डिमांड ड्राफ्ट आलेले असतात. अशा व्यवहारातून प्रत्येक बँकेला इतर बँकाकडून काही पैसे येणे व काही देणे असतात या व्यवहारांची पुर्तता करण्यासाठी बँकांचे प्रतिनिधी प्रत्येक दिवशी निरसन गृहांमध्ये एकत्र जमून आपापसातील निव्वळ येणी-देणी ठरवतात. हा व्यवहार रोखीने करण्याऐवजी आरबीआय वर चेक, ड्राफ्ट काढून पूर्ण केला जातो. प्रत्येक बँकेचे आरबीआय मध्ये खाते असते त्या चेक, ड्राफ्ट नुसार आरबीआय संबंधित बँकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करते किंवा कमी करते.


6) पतनियंत्रण – व्यापारी बँका ठेवी स्वीकारून त्यातून कर्ज देत असतात या प्रक्रियेत बँक पतनिर्मिती करीत असतात व्यापारी बँकेच्या पत निर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य आरबीआय करते.

 

7) परकीय चलन साठ्याचा नियंत्रक – देशाच्या परकीय चलन साठ्याचा सांभाळ आरबीआय करते. चलनाच्या अंतर्गत व बहिर्गत मूल्य स्थिर राखण्याचे कार्य आरबीआयला करावे लागते. रिझर्व बँक ऑफ इंडिया चलन साठ्याचा सांभाळ करून त्याचा वापर व्यवहार तोल संतुलित ठेवण्यासाठी तसेच रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी करते. रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्याच्या आरबीआयच्या धोरणाला Sterilisation Policy असे म्हणतात.


8) बँक व्यवस्थेची नियंत्रक – रिझर्व बँक बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण करीत असते. देशातील सर्व व्यापारी बँका वित्तीय संस्था यांचे नियमन रिझर्व बँक करते. प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँका यांच्या कामकाजाचे नियमन रिझर्व बँकेचा ग्रामीण नियोजन व पत विभाग करतो.

No comments:

Post a Comment