Wednesday, 10 November 2021

मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप

मंगळ ग्रहावरच्या (Mars) मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार करण्यात मानवाला मोठे यश आलं आहे. अमेरिकन फूड कंपनी हेन्झने (Heinz) मंगळ ग्रहासारख्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप तयार केले आहे. मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे केले गेले आहे. (Heinz makes Mars Edition tomato ketchup grown in Mars soil)

टोमॅटो पिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा शोध

पृथ्वीवरच्या मातीच्या उलट, मंगळाची माती पिकांसाठी कठोर आहे. मंगळ ग्रहावरची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते. त्या मातीत सेंद्रिय पदार्था नसतात. याशिवाय मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो. यामुळे, टोमॅटो पिकवणाऱ्या टीमने ते वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून त्याचा वापर केला आणि त्यांना यश आलं.

‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप

हेन्झने तयार केलेल्या ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले आहे. हेन्झने मार्स व्हर्जन केचपची बाटलीही अंतराळातपण पाठवली होती, जिथे ही बाटली -94 अंश तापमानात होती.

हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का, त्याचं केचप बनवू शकतील की नाही हे शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.

हे टोमॅटो तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे शेती करणे कठीण होत चाललय. अशा प्रकारे पृथ्वीवरही शेती करणं शक्य आहे. नासाचे (NASA) माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो म्हणाले की, घरापासून (पृथ्वीपासून) ईतके दूरवर पिकवलेल्याली चव परिचयाची असणे हे मानवाच्या कल्याणासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...