भारत सरकारने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) या सरकारी कंपनीला 'महारत्न' दर्जा प्रदान केला आहे.
▪️ठळक बाबी
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) ही वीज मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील असलेली सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे.
PFC ही ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील 11 वी कंपनी ठरली आहे.
कंपनीला 'महारत्न' दर्जा प्राप्त झाल्यामुळे, PFC अधिक चांगल्यापणे गुंतवणूक करण्यास, संयुक्त आर्थिक उपक्रम आणि पूर्ण मालकीच्या उपकंपन्या तयार करण्यास सक्षम असेल. तसेच कंपनी भारतामध्ये तसेच विदेशात विलीनीकरण आणि अधिग्रहण यासंबंधीचे कार्ये करू शकणार.
‘महारत्न’ दर्जाविषयी
केंद्रीय सरकारने ‘महारत्न’ दर्जाच्या स्थापना 2009 साली केली. मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांना (C.P.S.E) आपल्या कार्याचा विस्तार करणे आणि जगातील एक मोठी कंपनी म्हणून नावारूपास येण्यास सक्षम करणे हा या मागचा हेतु आहे.
‘महारत्न’ दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीला 'नवरत्न' दर्ज़ा प्राप्त झालेला असावा लागतो. तसेच मागील तीन वर्षांच्या कालावधीत सरासरी वार्षिक भागभांडवल 15,000 कोटी रुपये यापेक्षा अधिक असावे लागते. कंपनीची वैश्विक पातळीवर महत्वपूर्ण उपस्थिती / आंतरराष्ट्रीय कार्ये असावे लागते.
No comments:
Post a Comment