🔰महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) अंतर्गत ‘हवामान लवचिकता माहिती प्रणाली आणि नियोजन (CRISP-M / Climate Resilience Information System and Planning) टूलचे अनावरण केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री श्री गिरिराज सिंह यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी केले.
🔴ठळक बाबी..
🔰महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) अंतर्गत भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित पाणलोट नियोजनामध्ये हवामान माहिती एकत्रित करण्यासाठी हे डिजिटल साधन विकसित करण्यात आले आहे.ते ब्रिटन देशाच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे.
🔰ह साधन सात राज्यांमध्ये वापरले जाईल जिथे ब्रिटन सरकारचे फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) आणि भारताचे ग्रामीण विकास मंत्रालय संयुक्तपणे हवामान लवचिकतेच्या दिशेने काम करीत आहेत.
🔰बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि राजस्थान ही ती राज्ये आहेत.
🔰CRISP-M मनरेगा योजनेच्या GIS आधारित नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये हवामानविषयक माहिती जोडण्यास मदत करेल. त्यामुळे ग्रामीण समुदायासाठी हवामान बदलांसंबंधीच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन शक्यता खुल्या होतील.
No comments:
Post a Comment