Wednesday, 13 October 2021

भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC

शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल.

जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...