Friday, 15 October 2021

‘पीएम गतीशक्ती’ कार्यक्रम

🧣13 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या “पीएम गती शक्ती” या नावाने बहू-पद्धती संपर्कासाठीच्या राष्ट्रीय मास्टर योजनेचा शुभारंभ केला. नवी दिल्लीत या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.

🛑योजनेविषयी

🧣ही योजना एकापासून ते दुसऱ्या पद्धतीच्या वाहतूक पद्धतीने लोक, वस्तूमाल आणि सेवांच्या दळणवळणासाठी एकात्मिक आणि अखंड संपर्क व्यवस्था प्रदान करेल.

🧣सर्वसमावेशकता, प्राधान्यक्रमाची निश्चिती, सुयोग्य उपयोजन, तादात्म्य, विश्लेषणात्मक, गतीशील या सहा स्तंभावर “पीएम गतीशक्ती” आधारित आहे.

🧣ही योजना महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे समग्र नियोजन हितसंबंधींकरता संस्थात्मक करणार आहे. स्वतंत्र पद्धतीने आपापल्या विभागांमध्ये नियोजन आणि रचना करण्याऐवजी, प्रकल्पांची रचना आणि उभारणी सामाईक दृष्टीकोनातून होणार आहे.

🧣योजना केंद्रीय सरकारची विविध मंत्रालये आणि राज्य सरकार यांच्या भारतमाला, सागरमाला, देशांतर्गत जलमार्ग, ड्राय/लँड पोर्ट, उडान इत्यादींसारख्या पायाभूत सुविधा योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करणार आहे.

🧣बहू-पद्धती संपर्क व्यवस्थेमुळे लोकांना प्रवास करण्यासाठी, वस्तू आणि सेवांची वाहतुकीच्या एका साधनातून दुसऱ्या साधनाद्वारे वाहतूक करण्यासाठी एकात्मिक आणि सुविहित संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा लाभ शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...