Saturday 30 October 2021

एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ नामक गस्त सरावात भारतीय सैन्याला सुवर्ण पदक मिळाले.



13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ब्रेकन (वेल्स, ब्रिटन) येथे आयोजित केलेल्या ‘एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ नामक गस्त सरावात भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4/5 गोरखा रायफल्स (फ्रंटियर फोर्स) संघाला सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


ब्रिटीश लष्कराच्या भूदलाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल सर मार्क कार्लटन-स्मिथ यांनी 15 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या एका औपचारिक समारंभात भारतीय लष्कराच्या संघाला सुवर्णपदक प्रदान केले.


▪️ठळक बाबी.


‘एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ हा एक बहुपक्षीय लष्करी गस्त सराव आहे, जो ब्रिटीश लष्कराच्या भूदलाच्यावतीने आयोजित करण्यात येतो.


हा सराव म्हणजे मानवी सहनशक्ती आणि संघभावना यांची अत्युच्च चाचणी परीक्षा समजली जाते आणि जगभरातील लष्करी समुदायांमध्ये याला लष्करी गस्तीचे ऑलिम्पिक असे संबोधण्यात येते.


या सरावात एकूण 96 संघ सहभागी होते. या संघांमध्ये जगभरातील विशेष लष्करी दले आणि अत्यंत सन्माननीय पलटणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश होता.


या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झालेल्या संघांनी अतितीव्र वातावरण असलेले भूभाग आणि असह्य थंड वातावरण यामुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना केला. 


तसेच प्रत्यक्ष जगातील गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले,  जेणेकरून प्रत्यक्ष रणभूमीवर या लष्कराचे प्रतिसाद कसे असतील याचे परीक्षण करता येईल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...