🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत किंवा निर्णय न घेण्याबाबत प्रयत्न करण्याची कृती दबाव समजून अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
🔰एमपीएससीकडून या संदर्भातील प्रसिद्धिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. आयोगामार्फत भरती प्रक्रियेत नियमांना बगल देऊन किंवा अपवाद करून एखाद्या विशिष्ट प्रकरणी कार्यवाही करण्याची किंवा कार्यवाही न करण्याची गैरवाजवी अपेक्षा किंवा मागणी संबंधित लाभार्थी उमेदवार किंवा काही संघटित किंवा असंघटित घटकांकडून केली जात असल्याचे दिसून आले आहे.
🔰तयासाठी शासन यंत्रणा किंवा राजकीय, अराजकीय, व्यक्ती, घटकांमार्फत दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे, विविध प्रसिद्धी, समाजमाध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे विविध पद्धतीने आयोगावर येणाऱ्या दबावाची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment