पाणी, वारा, बर्फ आदि नैसर्गिक शक्तींच्या अखंड आघातामुळे जमिनीची धूप होते
परंतु वाहत्या पाण्यामुळे ही धूप अधिक होते.
♦️ धपीचे प्रमुख तीन प्रकार पडतात.
1)सालकाढी धूप
2)ओघळपाडी धूप
3) प्रवाहकाठपाडी धूप.
🔴सालकाढी धूप
* एकतर्फी व कमी उताराच्या जमिनीची अशी धूप होते.
* पावसाच्या माऱ्याने मातीचे कण विलग होतात आणि पृष्ठभागावरून पाणी वाहू लागताच त्याबरोबर हे मातीचे कण वाहून नेले जातात. असे जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी गढूळ असते.
*अशा प्रकारच्या धुपीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचा पातळ थर दरसाल वाहून जातो व त्यामुळे जमीन निकस बनते.
* वर्षानुवर्षे अशी माती वाहून गेल्यामुळे मातीचा मूळ रंग बदलून तो भुरकट होतो व कालांतराने जागोजागी मुरूम उघडा पडतो.
🔴 ओघळपाडी धूप
* पावसाचे साचलेले पाणी जास्त झाले म्हणजे ते प्रवाहाच्या रूपाने जमिनीवरून वाहू लागते व प्रथम लहान लहान ओघळी तयार होतात.
*पुढे त्यांच्यामधून वर्षानुवर्षे पाण्याबरोबर माती वाहून जाते आणि ह्या ओघळी आकारमानाने मोठ्या होतात व त्यांचे रूपांतर मोठ्या घळीत होते.
*अशा रीतीने शेतात घळीओघळींचे एक मोठे जाळेच पसरते व त्यामुळे मशागत करणे दुरापास्त होते आणि जमिनी पडीत राहतात.
🔴 परवाहकाठपाडी धूप
* घळीमधूनच पुढे नाल्यांची उत्पत्ती होते.
*त्यांच्याद्वारे व जमिनीतून जादा पाणी काढून देण्यासाठी काढलेल्या चरांमुळेदखील जमिनीची धूप होते.
* नाल्यांच्या व चरांच्या बाजू ढासळून ती माती प्रवाहाबरोबर वाहून जाते, तसेच त्यांचे तळदेखील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे खरडून जातात.
* अशा रीतीने नदीनाल्याकाठच्या जमिनी प्रवाहाच्या वेगामुळे धुपून जातात व यास प्रवाहकाठाची धूप म्हणतात.
No comments:
Post a Comment