Wednesday, 13 October 2021

महाराष्‍ट्राचा-नदी प्रणाली


नदी प्रणाली


 


👉 महाराष्ट्रात प. घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.


👉 १) पश्चिम वाहिनी – या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.


👉 अ) तापी – ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.


 


👉 तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे


👉 ब) कोकणातील नद्या – 


 


👉 सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.

कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.


👉 कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (१३० कि.मी.)


👉 कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (१२४ कि.मी.)


👉 उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास


👉 मध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.


👉 दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल


👉 २) पुर्व वाहिनी नद्या – या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.


👉 अ) गोदावरी खोरे – गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.


👉 १) गोदावरी नदी – हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते. 



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...