Wednesday, 26 June 2024

महाराष्‍ट्राचा-खनिज संपत्ती

👉 महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात.


👉 दशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.


👉 महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.


👉 दशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. 


👉 महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.


👉 दशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. 


👉 तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.


👉 कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व सिलिमिनाईटचे साठे आहेत.

कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.

भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. 


👉 यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.


👉 महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.

हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.


👉 दशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो. 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...