Friday, 15 October 2021

नेशन्स लीग फुटबॉल - एम्बापेमुळे फ्रान्सला विजेतेपद.

🔰अखेरची १० मिनिटे शिल्लक असताना किलियान एम्बापेने केलेल्या निर्णायक गोलमुळे जगज्जेत्या फ्रान्सने अंतिम सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव करत नेशन्स लीग फुटबॉलचे जेतेपद मिळवले. सॅन सिरो स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना आक्रमणात चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.

🔰उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ६४व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबालने गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. अनुभवी करीम बेन्झेमाने उत्कृष्ट गोल केल्यामुळे फ्रान्सने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ८०व्या मिनिटाला थिओ हर्नाडेझच्या पासवर एम्बापेने गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

🔰अखेरच्या काही मिनिटांत स्पेनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोलरक्षक ह्य़ुगो लॉरीसने दोनदा अप्रतिमरीत्या चेंडूला गोलजाळ्यात जाण्यापासून अडवत स्पेनला बरोबरी साधू दिली नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...