Thursday 21 October 2021

भारतीय पाणबुडी रोखल्याचा पाकिस्तानचा दावा

🔰भारताची एक पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत असताना रोखल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

🔰ही भारतीय पाणबुडी पाकिस्तानी नौदलाच्या गस्ती विमानाने पाहिली होती, असे पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाने म्हटले आहे की, १६ ऑक्टोबरला ही पाणबुडी पाकिस्तानी सागरी हद्दीत येताना दिसली.  भारतीय नौदलाकडून हा  प्रकार तिसऱ्या वेळी झाला असून  तीनही वेळा या पाणबुड्या शोधण्यात  पाकिस्तानी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या गस्ती विमानांनी यश मिळवले आहे. आताच्या घटनेचे चित्रीकरणही पाकिस्तानने प्रसारित केले आहे.

🔰पाकिस्तानी नौदल सतत सज्ज असून व्यावसायिक सतर्कता बाळगून आहे. आम्ही पुन्हा एकदा भारताची पाणबुडी येताना शोधली आहे असे पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे.

🔰यापूर्वी असा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता. त्यावेळी पाकिस्तानी नौदलाने भारतीय पाणबुडीचा सागरी हद्दीत प्रवेश रोखला होता. पाकिस्तानी नौदलाने त्यांचे विशेष कौशल्य वापरून भारतीय the पाणबुडीला घुसण्यापासून रोखले असे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्येही भारतीय लष्कराच्या पाणबुडीने पाकिस्तानी सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...