Wednesday, 6 October 2021

विविध समित्याविषयी थोडक्यात माहिती



1) रंजन गोगोई समिती 


मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.


2) परमराजसिंग उमरानंगल समिती 


भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


3) एच.एस. बेदी समिती 


शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.


4) गोपाळ सुब्रमण्यम समिती 


दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


5) दीपक मोहांती समिती 


वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.


6) श्याम बेनेगल समिती 


सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.


7) अरविंद पनगारिया समिती 


जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी


8) एम. वेंकच्या नायडू समिती 


जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती


9) बी.के. प्रसाद समिती 


इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.


10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती 


ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.


11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती 


राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली


12) प्रो. राकेश भटनागर समिती 


जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती


13) विलास बर्डेकर समिती 


राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.


14) भगवान सहाय्य समिती 


राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...