Wednesday, 8 May 2024

पोलीस भरती


1】' राजुला प्रेमाचे पत्र आले ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?

1)चेताणगुणोक्ती 

2)ससंदेह 

3)श्लेष  

4)अपन्हुती


उत्तर- श्लेष


 2】' त्याने अभ्यास केला ' प्रयोग ओळखा ?

1)भावे प्रयोग 

2)कर्तरी प्रयोग 

3)कर्मणी प्रयोग 

4)संकीर्ण प्रयोग 


उत्तर- कर्मणी प्रयोग


 3】' श्रीरामनवमी ' हा शब्द किती अक्षरी आहे ?

1)सहा 2)सात 

3)नऊ  4)आठ


उत्तर- सहा


 4】विसर्ग हा एक ..... वर्ण आहे.

1)तालव्य 2)ओष्ठय 

3)कंठय   4)दंततालव्य


उत्तर- कंठय


 5】' मला परीक्षेत पहिला नंबर मिळाला पाहिजे ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

1)आज्ञार्थी 2)स्वार्थी 

3)विध्यर्थी 4)संकेतार्थी


उत्तर- विध्यर्थी


 6】खालील वाक्यातील अलंकार ओळखा 

शरीराच्या ठेवणीप्रमाणे नीलूच्या सवयी व स्वभावही वेगळा होता

1)रूपक 2)उपमा 

3)उत्प्रेक्षा 4)स्वभावोक्ती


उत्तर- उपमा


 7】यक्षप्रश्न असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा ?

1) महत्वाची गोष्ट असणे 

2) योग्य प्रश्न असणे 

3) अयोग्य प्रश्न असणे

4)महत्वाची गोष्ट नसणे


उत्तर- योग्य प्रश्न असणे


 8】मी खूप लिहू लागलो-कविता, कथा, चित्रपटकथादेखील !

वरील वाक्याचा प्रकार सांगा ?

1)मिश्र वाक्य 

2)संयुक्त वाक्य 

3)केवल वाक्य 

4)संयुक्त-मिश्र वाक्य


उत्तर- केवल वाक्य


 9】अबीरमंजिरी या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ?

1)अव्ययीभाव समास 

2)तत्पुरुष समास 

3)द्वंद्व समास 

4)बहूव्रीही समास


उत्तर- द्वंद्व समास


 10】गर्द या शब्दाच्या विरुद्ध अर्थचा शब्द निवडा ? 

1)पातळ 2)विरळ 

3)दाट    4)कमी


उत्तर- विरळ


 11】कपडा शिवताना कडेने सोडलेल्या जागेस काय म्हणतात?

1)माया 2)तट 

3)सूत   4)तीर


उत्तर- माया


 12】कोल्हा : लबाड : : सिंह : ?

1)चपळ 2) हिंस्र 

3) राजा 4) आळशी


उत्तर- हिंस्र


13】' रुधिर ' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा? 

1)पाणी    2)रक्त 

3)म्हातारा 4)दारू


उत्तर- रक्त


 14】खलीलपैकी वेगळा पर्याय ओळखा? 

1)नोटा 2)लाटा 3)गोटा 4)वाटा


उत्तर- गोटा


 15】अनुक्रमे पुलिंगी-स्त्रीलिंगी-नपुसकलिंगी असलेला पर्याय ओळखा?

1)मन-भाव-भावना

2)वाट-रास्ता-वळण 

3)देश-मातृभूमी-राष्ट्र 

4)पाणी-लाट-समुद्र


उत्तर- देश-मातृभूमी-राष्ट्र


 16】समोर असलेल्या नमुन्याप्रमाणे जसेच्या तसे लिहिणे म्हणजेच......होय?

1)श्रुतलेखन 2)गतिलेखन

3)शुद्धलेखन 4)अनुलेखन


उत्तर- अनुलेखन


 17】खालीलपैकी भाषेची ग्रहनात्मक कौशल्ये कोणती आहेत?

 1)वाचन-लेखन

 2)भाषण-लेखन

 3)वाचन-श्रवण

 4)भाषण-श्रवण


उत्तर- वाचन-श्रवण


 18】वेगळा पर्याय निवडा ? 

1)पानिपत 2)झाडाझडती

3)मृत्युंजय 4)महानायक


उत्तर- मृत्युंजय


 19】वेगळा पर्याय निवडा ?

 1)खग 2)अचल 

 3)शैल  4)नग


उत्तर- खग


 20】वेगळा पर्याय निवडा ? 

1)मृग   2)सारंग 

3)कुरंग 4)कुंजर


उत्तर- कुंजर


 21】खालील पर्यायात संयुक्त क्रियापद असलेला पर्याय निवडा.

1)येऊन कर 2)पाळायला जा

3)मारून ये  4)खाऊन जा


उत्तर- पाळायला जा


 22】'तू फूल तोडलेस' या वाक्याचा प्रयोग सांगा?

1)कर्तृ-कर्म  2)कर्तृ-भाव 

3)कर्म-भाव 4)कर्म-कर्तृ


उत्तर- कर्तृ-कर्म


 23】वेगळा पर्याय निवडा.

1)भेरी    2)पडघम 

3)नगारा 4)तकलुबी


उत्तर- तकलुबी


 24】'अंगांत मांग शिरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा? 

1) त्वेष चढणे 

2) अंगात वारे येणे 

3) चांगले कृत्य करणे 

4) वाईट गोष्ट बोलणे


उत्तर- त्वेष चढणे


 25】'पहिली वस्तू मागणारा' या शब्द समुहासाठी योग्य शब्द सांगा?

1) भिकारी 2) मागरा 

3) हावरट  4) मळगी


उत्तर- मागरा


 26】मोठा भाऊ या टोपणनावाने कोणास ओळखले जाते? 

1) वि. वा. शिरवाडकर 

2) प्र. के. अत्रे 

3) कृ. के. दामले   

4) चि. त्र्यं. खानोलकर


उत्तर- वि. वा. शिरवाडकर

No comments:

Post a Comment