Sunday, 3 October 2021

कर्नाळा अभयारण्य

🔹कर्नाळा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.

🔸पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे.

🔹कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात.

🔸सुमारे १२ चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे.

🔹हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोर्‍यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे.

🔸मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरडया,  तांबट,  कोतवाल, पांढर्‍या  पाठीची गिधाडे,  दयाळ  शाहीनससाणा,  टिटवी,  बगळे असे अनेक पक्षी आढळतात.

🔹हे अभयारण्य  रायगड जिल्हयात  पनवेल तालुक्यात असून ते  मुंबईपासून  ६२ कि.मी. अंतरावर आहे. ✅

🔸यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...