🔰जपानचे माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वपदाची निवडणूक बुधवारी जिंकली असून ते आता पुढील पंतप्रधान असणार आहेत. त्यांच्यापुढे करोना साथीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था व अमेरिकेबरोबर ठोस आघाडी याबरोबरच अनेक प्रादेशिक प्रश्नांची आव्हाने आहेत.
🔰किशिदा यांनी आधीचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांची जागा घेतली. सुगा यांनी सप्टेंबरमध्ये कार्यभार घेतला होता त्याला वर्ष पूर्ण होत असतानाच पायउतार व्हावे लागत आहे.
🔰लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक झाली असून त्यात त्यांची निवड झाल्याने संसदेत सोमवारी त्यांची पंतप्रधानपदी निवड होणार आहे, कारण संसदेत त्यांचा पक्ष व मित्र पक्षांचे प्राबल्य आहे. किशिदा यांनी नेतृत्वपदाच्या लढतीत लसीकरण मंत्री टारो कोनो यांचा पराभव केला असून पहिल्या टप्प्यात ते एकाच मताने आघाडीवर होते. याशिवाय दोन महिलांसह चार उमेदवार होते, त्यांना बहुमत मिळाले नाही.
No comments:
Post a Comment