🔰जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुक आयएनसी आपलं नाव बदलण्याचा विचार करत आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरु असून पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात चर्चा होणार आहे. मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु असल्याचं वृत्त द व्हर्जने मंगळवारी दिलं आहे.
🔰फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्हर्जच्या वृत्तामध्ये व्यक्त करण्यात आलीय.
🔰मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.
No comments:
Post a Comment