Monday, 11 October 2021

"त्रिशूल" आणि “गरुड”: तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आलेल्या रेलगाड्या.



🔰परथमच, भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे (SCR) विभागाने दोन लांब पल्ल्याच्या मालवाहू रेलगाड्या चालवल्या, ज्यांना प्रत्येकी तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आले.


🔰या नवीन मालवाहू रेलगाड्यांना "त्रिशूल" आणि “गरुड” असे नाव देण्यात आले आहेत. या गाड्यांना 177 डब्बे जोडले गेले आहेत."त्रिशूल" गाडीने 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोंडापल्ली स्थानकापासून ते पूर्व किनारी रेल्वेच्या खुर्दा विभागापर्यंत पहिला प्रवास केला.


🔰"गरुड" गाडीने 8 ऑक्टोबर 2021 रोजी गुंटकल विभागातील रायचूर ते सिकंदराबाद विभागातील मनुगुरु पर्यंत पहिला प्रवास केला.याप्रकारे मालाची वाहतूक विक्रमी पद्धतीने होणार असून त्यामागील खर्च देखील कमी येणार आहे. तसेच लागणारे मनुष्यबळ देखील कमी लागणार.

भारतीय रेल्वे विषयी


🔰भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


🔰भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...