Sunday, 17 October 2021

करोना विषाणूला पेशीतून प्रवेश करण्यास रोखणाऱ्या संयुगाचा शोध



🔰करोना विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखणारे संयुग वैज्ञानिकांनी तयार केले असून संसर्गाच्या आधीच्या टप्प्यात ते दिल्यास करोनाचा संसर्ग होत नाही.


🔰एमएम ३१२२ हे संयुग विषाणूच्या अनेक वैशिष्टय़ांमध्ये बदल करते. हे संयुग वापरल्यानंतर विषाणूत असे बदल होतात की, जे त्याला पेशीत प्रवेश करू देत नाहीत, असे ‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात म्हटले आहे की, विषाणूतील जे प्रथिन मानवी पेशीवर आघात करते त्याला ट्रान्समेम्ब्रेन सेरीन प्रोटिएज २ असे म्हणतात.


🔰वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक जेम्स डब्ल्यू जॅनेटका यांनी म्हटले आहे की, आता सार्स सीओव्ही २ वर अनेक लशी उपलब्ध आहेत. असे असले तरी विषाणूविरोधी औषधांची गरज आहे. कारण करोनाची जगातील स्थिती फारशी सुधारलेली नाही. आता जे संयुग शोधून काढण्यात आले आहे ते विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखते. जॅनेट यांनी पुढे म्हटले आहे की, तोंडावाटे घेतले जाणारे इनहिबिटर्स असतात त्यातून हे संयुग देण्याची गरज आहे. त्यातून करोनावर परिणामकारक पद्धतीने मात करता येईल.


🔰सार्स सीओव्ही २ सारखे अनेक विषाणू आहेत. त्यात करोना विषाणूंचा समावेश होतो. इन्फ्लुएंझासारखेही विषाणू आहेत. ते प्रथिनांच्या मदतीने मानवाला संसर्ग करीत असतात. नंतर ते फुफ्फुसात पसरतात. विषाणू पेशीत शिरल्यानंतर एपिथेलिया पेशींवर हल्ला करतो. नंतर मानवी पेशीतील टीएमपीआरएसएस २ हे प्रथिन विषाणूच्या प्रथिनाला तोडते. त्यामुळे करोनापासून बचाव होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...