Sunday, 31 October 2021
Saturday, 30 October 2021
खालाटी आणि वलाटी
◼️ खालाटी ( पश्चिम कोकण )◼️
▪️समुद्रकिनाऱ्यास लागून असलेला कमी उंचीचा भाग
▪️येथे गाळाची चिंचोळी मैदाने आढळतात तसेच या भागात नारळीच्या व सुपारीच्या बागा जास्त आहेत
◾️वलाटी ( पूर्व कोकण) ◾️
▪️सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागाचा यात समावेश होतो.
◾️अधिक उंच सखल भाग असल्यामुळे येथे शेतीची अत्यल्प विकास झालेला आहे.
◾️या भागात फलोत्पादन केले जाते. यामध्ये फणस आणि आंबा ही प्रमुख फालोत्पादन केले जाते. यामध्ये फणस आंबा ही प्रमुख फलोत्पादन पिके आहेत
कोकणची माहिती
🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :
[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]
1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट
🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम
1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल
🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे
1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी
प्रश्न मंजुषा
चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसतो?
1)59%✅
2)48%
3)49%
4)9%
सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?
1)9 मिनिट
2)8 मिनीट✅
3) 7 मिनिट
4)5 मिनिट
*मुचकुंदी प्रकल्प कोणत्या दोन राज्यात आहे?*
1)आंध्रप्रदेश ओरिसा ✅
2)महाराष्ट्र मध्य प्रदेश
3)छत्तीसगड मध्यप्रदेश
4)महाराष्ट्र तेलंगणा
उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
1) तापी✅
2) गोदावरी
3) नर्मदा
4) गंगा
कोकणाची सरासरी रुंदी............की. मी आहे.
1)30 ते 50
2)35 ते 55
3)30 ते 60✅
4)15 ते 30
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत?
1)चंद्रपूर
2) भंडारा
3) गडचिरोली ✅
4) गोंदिया
बिग- बॅग थेअरी प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत सर्वप्रथम ....... प्रस्तावित केला होता?
1)अल्बर्ट आईन्स्टाईन
2)जॉर्जस लिमैत्रे✅
3)आयसॅक न्यूटन
4)स्टिफन हॉकिंग
असा कोणता देश आहे ज्यात कोणताही खानिज आढळत नाही?
1) फ्रान्स
2)पेरू
3)स्विझर्लांड ✅
4)स्वीडन
पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
1) नागपूर ✅
2) औरंगाबाद
3) बुलढाणा
4) नाशिक
पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधील सरासरी अंतर किती आहे?
1)150 दशलक्ष किमी✅
2)150 लक्ष किमी
3)150 प्रकाश वर्ष
4)150 कोटी किमी
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर स्थित आहे?
सातपुडा....
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे
◆पुणे:-राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित विद्यापीठ
◆सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा
◆नागपूर:-महाराष्ट्रातील पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा सुरु
◆ठाणे:- महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद
◆सांगली:- महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना
◆रायगड:- महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य
◆बोल्डावाडी (हिंगोली):- महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग
◆अंधेरी:- महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र
◆ सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा
◆सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली
◆चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र
◆चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर
◆ गडचिरोली:- महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा
◆इस्लामपूर (सांगली) :- महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका
◆पाचगाव (नागपूर) :- महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव
◆परसोडी (यवतमाळ):- महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत
◆लेखामेंडा (गडचिरोली):- महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव
◆चंद्रपूर एस.टी. आगार:- महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष
◆चंद्रपूर जिल्हापरिषद:- महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद
◆पुणे:- महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र
◆सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल
देशातील पहिल्या घटना
देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)
देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य- उत्तराखंड
देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज - काटेवाडी
देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे
देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर - झारखंड
देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू
देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर
देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)
देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र - हडपसर (पुणे)
देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
चला जाणून घेऊ - भूगोल : पर्वतांचे प्रकार
💠 सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय. जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार
▪ वलित पर्वत : वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात
▪ विभंग-गट पर्वत : विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.
▪ घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.
▪ ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.
▪ अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.
प्रदेश संकल्पना
प्रदेश म्हणजे काय? याचे अगदी साधे सरळ उत्तर ‘एखाद्या विस्तीर्ण क्षेत्राचा लहानसा भाग’ असे सहजपणे देता येईल. एखादे क्षेत्र जेव्हा प्रदेश म्हणून विचारात घेतले जाते तेव्हा त्यात पुढील गोष्टी असणे अपेक्षित असतात.
कमीत कमी एका किंवा जास्त गुणधर्माबाबत क्षेत्रात साम्यता/एकरुपता असणे.
क्षेत्रीय संलग्नता.
क्षेत्रास सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणे
साधर्म्य.
बहुतांश कापूस क्षेत्र मध्यम पर्जन्याच्या प्रदेशात एकवटलेले आहे.
भूमी संसाधने व भूमी उपयोजन
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3,07,580 चौ.किमी आहे.
भूमी संसाधनांचा सर्वात जास्त वापर शेतीसाठी केला जातो.
शेतीसाठी भूमीची उपलब्धता उंचसखलपणा आणि उतार यांवर ठरते. तर तिची शेतीसाठीची उपयुक्तता प्रदेशातील पर्जन्यावर व मृदांच्या स्थितीवर ठरते.
कोकण व पश्चिम घाट या भागात उंचसखलपणा जास्त आहे. त्यामुळे तेथील भूमीच्या वापरावर मर्यादा पडतात.
राज्यातील पूर्वेकडील प्रेदशात इतर उद्देशांसाठी विशेषत: वनक्षेत्र तसेच खनिज उत्पादनासाठी बरीचशी जमीन वापरली जात असल्याने या भागातही शेतीसाठी जमीन कमी प्रमाणात उपलब्ध होते.
मध्य महाराष्ट्रात पर्जन्य कमी प्रमाणात मिळते. अर्थात यामुळे जमिनीची उपलब्धता कमी होत नाही, मात्र तिची शतीसाठी उपयुक्तता बरीचशी कमी होते.
तापी, गोदावरी, वर्धा-वैनगंगा, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या पूर मैदानाच्या भागातील भूमी त्यामानाने शेतीसाठी उपयुक्त आहे.
१. लागवडीखालील क्षेत्र
महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 56.6 टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. यालाच लागवडीखालील क्षेत्र म्हणतात.
प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, जलसिंचन सुविधा, उताराचे स्वरुप यांचा परिणाम लागवडीखालील क्षेत्रावर होतो.
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70 टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे.
कोकण तसेच पूर्व विदर्भामध्ये जमिनीचे तीव्र उतार व वनांचे आच्छादन यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे.
वाढत्या लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे शेतजमिनीचा वापर घरांसाठी, वस्त्यांसाठी होत असल्याने शहरी भागाजवळील लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट होत आहे.
२. वनक्षेत्र
महाराष्ट्रामध्ये पडणारा सरासरी पर्जन्य सुमारे 1000 मिमी आहे. पर्जन्याच्या वितरणावर वनाचे क्षेत्र अवलंबून असते.
सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात वने आढळतात.
मध्ये महाराष्ट्र हे अवर्षणप्रवण क्षेत्र असल्याने वनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तेथे सपाट भूमीचा वापर शेतीसाठी केला जातो.
प्रत्येक प्रदेशाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूमीच्या 33 टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात हे प्रमाण खूप कमी आहे. राज्याच्या 17 टक्के क्षेत्रामध्ये वने आहेत.
वनांचे क्षेत्र वाढवण्यासाठी सामाजिक वनीकरण योजना राबवून वनांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
३. पडीक क्षेत्र
ज्या क्षेत्रामध्ये कधीही पीक घेणे शक्य नसते ते कायम पडीक क्षेत्र होय.
मुसळधार पर्जन्यामुळे मृदेचा उत्पादक थर वाहून जातो व जमिनी कायमच्या नापीक होतात. तसेच काही जमिनीवर पाणी साठून तेथे दलदल तयार होते त्यामुळे पीक येऊ शकत नाही. विशेषत: कोकण किनार्यावरील खारभूमी प्रदेश कायम पडीक स्वरुपात आहेत.
महाराष्ट्राचे मोठे क्षेत्र पर्जन्याव अवलंबून आहे. एखाद्या वर्षी पेरणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही तर जमिनी पडीक ठेवाव्या लागतात. अशा जमिनी चालू पडीक क्षेत्र म्हणून ओळखल्या जातात.
जलसिंचन सुविधा पुरवल्यास हे क्षेत्र लागवडीयोग्य बनवता येईल. तसेच त्या जमिनीचा वनशेती किंवा फलोत्पादनासाठी उपयोग करता येईल.
कोणत्याही प्रदेशातील भूमी उपयोजन हे शेती व्यवसायावर नियंत्रण करणारे प्राकृतिक घटक आण आजचा समाज यांच्या परस्परक्रियेतून निर्माण होत असते.
४. बिगर शेती क्षेत्र
ज्या क्षेत्रामध्ये शेती केली जात नाही त्या क्षेत्राला बिगरशेती क्षेत्र असे म्हणतात. वसाहतीसाठी भूमीचा वापर केला जातो.
महाराष्ट्रामध्ये नागरीकरण तसेच औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. अन्य वापरात असलेल्या क्षेत्राचा उपयोग वस्त्यांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी केला जात आहे.
१. काळी मृदा
बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात.
मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.
या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.
महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.
महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.
२. जांभी मृदा
2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.
सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.
या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.
महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते.
या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते. डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.
३. गाळाची मृदा
सततच्या संचयनामुळे नदी खोर्यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते.
बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.
महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.
उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.
गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.
४. तांबडी-पिवळसर मृदा
महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.
ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.
तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.
मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते.
ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.
या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात.
मृदेची अवनती
मृदांची सुपीकता कमी होणे, त्यांच्या गुणात्मक पातळीचा र्हास होणे या स्थितीला मृदेची अवनती असे म्हणतात.
मृदेचा अतिवाप, अतिजलसिंचन, रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादीमुळे मृदेची अवनती होते.
चक्रीय पीक पद्धती, जमीन काही काळ पडीक ठेवणे, सेंद्रिय खतांचा वापर इत्यादी उपयांद्वारे मृदेची अवनती कमी करता येते.
महाराष्ट्रात जलसिंचन क्षेत्रात मृदा अवनतीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आणि जलसिंचनामुळे मृदेच्या खोल थरातील क्षार मृदेच्या वरच्या थरात जमा होऊन वरचा थर नापीक बनतो. त्यामुळे जलसिंचन प्रदेशातील विस्तारीत क्षेत्र पीक लागवडीसाठी अयोग्य झाले आहे.
भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी.
🎇 भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी. 🎇
🌸 भारतात पहिल्यांदा 1951मध्ये निवडणूक घेतली गेली. यामध्ये 45.7 टक्के मतदान झालं होतं.
🌸1966मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली.
🌸1974मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली.
🌸आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला.
🌸1983 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.
🌸राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे 1984 मध्ये केले होते.
🌸1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले.
🌸 2005 भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे.
🌸 पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या.
🌸 टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला.
🌸 अभिनव बिंद्रा याने 2008 बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.
🌸 संगीतकार ए.आर.रहमान याला 2009 मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
🌸2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले.
🌸अग्नि-5 क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता 2012 मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.
🌸मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून 2013 रोजी प्रक्षेपित केले गेले.
🌸कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
🌸देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ 2011 ला उपोषणात सहभागी झाली.
🌸2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता. यानंतर 2019मध्ये इस्रोचे चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं...
🌸 तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे...
🌸 जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविण्यात आलं. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख यांची केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने
1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.
A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
_____________________________________
⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899
_____________________________________
⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?
A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट
_____________________________________
. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?
A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम
_____________________________________
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔
_____________________________________
कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?
A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920
_____________________________________
जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन
_____________________________________
_____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939
__________________________________
'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
__________________________________
. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935
______________________________________