भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे 15 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली.
केंद्रीय वित्त आणि कंपनी कार्ये मंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेच्या कोषागार सचिव डॉ. जेनेट येलेन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाच्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान व्यापक आर्थिक दृष्टीकोन आणि कोविड-19 परिस्थितीत सुधारणा, आर्थिक नियामक आणि तांत्रिक सहकार्य, बहुपक्षीय सहभाग, हवामान बदल रोखण्यासाठी गुंतवणूक आणि काळ्या पैश्याला प्रतिबंध आणि दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासह (AML/CFT) विविध विषयांवर चर्चा झाली.
परस्पर आणि जागतिक आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण रणनीती आणि उपाययोजनांच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी दोनही देशांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य सुरू ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
2010 साली भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीची स्थापना करण्यात आली. दोनही देशांमधील आर्थिक बंध बळकट करण्यासाठी आणि भविष्यात अधिक सहकार्य आणि आर्थिक वाढ निर्माण करण्यासाठी ते एक चौकट म्हणून कार्य करते.
No comments:
Post a Comment