🔰केंद्रीय सरकारने 7 “मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरल पार्क (PM MITRA)” अर्थात “भव्य एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र आणि परिधान केंद्रे (पीएम-मित्र)” स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
🔰प्रकल्पांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योग नकाशात भारताला समर्थपणे स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
🔰पीएम-मित्र केंद्रे पंतप्रधानांच्या 5F संकल्पनेपासून प्रेरित आहेत. ही 5F संकल्पना म्हणजे “शेत ते धागा; धागा ते कारखाना; कारखाना ते फॅशन ते परदेश” अशी पाच सूत्रे होय. अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आणखी वाढीसाठी ही एकात्मिक संकल्पना उपयुक्त ठरणार आहे.
🅾ठळक मुद्दे
🔰पीएम-मित्र केंद्रे वेगवेगळ्या इच्छुक राज्यांमध्ये असलेल्या ग्रीनफील्ड / ब्राउनफील्ड ठिकाणी स्थापन केली जाईल. ज्या राज्यांमध्ये विद्यमान वस्त्रोद्योग परिसंस्थेच्या लगत एक हजार एकरांहून मोठा व विनापाश भूखंड उपलब्ध असेल, त्या राज्यसरकारांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.
🔰ग्रीनफील्ड क्षेत्रातील सर्व पीएम मित्र केंद्रांसाठी जास्तीतजास्त 500 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) आणि ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पीएम मित्र केंद्रांसाठी जास्तीतजास्त 200 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) सामायिक पायाभूत विकासासाठी (एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के) दिले जाणार आहे.
🔰पीएम मित्र केंद्रांमध्ये लवकरात लवकर वस्त्रोद्योग सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला 300 कोटी रुपयांचे स्पर्धात्मकता प्रोत्साहन पाठबळ (CIS) दिले जाणार आहे. राज्यात जागतिक स्तराचे उद्यम नगर स्थापित करण्यासाठी इतर प्रोत्साहनांबरोबरच राज्य सरकारतर्फे 1000 एकर जमीन दिली जाईल.
🔰ग्रीनफील्ड / ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पीएम मित्र केंद्रांसाठी भारत सरकारचा विकास भांडवली निधी (DCS) एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के परंतु जास्तीतजास्त 500 कोटी रुपये दिला जाईल.
🔰ब्राऊनफील्ड क्षेत्रांसाठी, मूल्यमापनानंतर, प्रकल्पातील विकासाधीन असलेल्या पायाभूत सुविधा व प्रकल्पाला सहाय्य्यभुत असलेल्या इतर सुविधांसाठी येणाऱ्या खर्चाच्या 30 टक्के, व जास्तीतजास्त 200 कोटी रुपयांपर्यंत विकास भांडवली निधी (DCS) दिला जाईल.
No comments:
Post a Comment