Wednesday, 26 June 2024

1857 चा राष्ट्रीय उठाव व त्याची कारणे

👉 सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता.

सन 1856 पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.


👉 सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.

इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते.


👉 लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पण हा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता.


👉 बरिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला.


👉 बरिटिशांनी भारत जिंकली व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले.


👉 या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले.


👉 शती भाती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते.


👉 1760-70 च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे.


👉 दशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही.


👉 शकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी 1773 ते 1786 च्या दरम्यान किमान 40 मोठे लष्करी संघर्ष झाले होते.

1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. 



👉1857 पूर्वीचे उठाव :


👉 भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इग्रंज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले.

शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केले.


👉 कपनी सरकारच्या काळात शेतकर्‍यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला.


👉 सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी उठाव केले. असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले.

भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले.


👉 छोटा नागपुर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड, महाराष्ट्र्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुध्द उठाव केले.


👉 बिहारमध्ये संथाळांनी तर फार मोठया प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या.


👉 महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी केलेल्या उठावही असाच तीव्र होता.

उमाजींनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले. उमाजी नाईक यांनी एक जाहिरनामा काढून इंग्रजांविरुध्द लढा देण्याचे व इंग्रज सत्ता झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले.


👉 1832 साली उमाजींना पकडून फाशी देण्यात आली.


👉 कोल्हापुर लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकार्‍यांविरुध्द वेळोवेळी उठाव केले होते.


👉 तयांपैकी 1806 सालच्या वेल्लोर येथील तसेच 1824 सालचा बराकपुर येथील उठाव हे विशेष उग्र स्वरूपाचे होते.

इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे परंतु त्यामुळे लोकांतील असंतोष फक्त दडपला गेला, तो नाहीसा झाला नाही, दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे 1857 साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गांत साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र उठावाने झाला. 



No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...