Sunday, 19 September 2021

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY):

भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तीन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.

नेहरू रोजगार योजना

अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर

प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी    

ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.

योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.

या योजनेत पुढील दोन उप-योजना राबविल्या जातात

अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment