☑️सिंगापूर आणि भारत या देशांच्या नौदलांमधील 28 व्या ‘SIMBEX’ ही सागरी द्विपक्षीय कवायत 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
☑️दक्षिण चीन सागरातील दक्षिण भागात सिंगापूर नौदलाने या युद्धसरावाचे आयोजन केले होते.
☑️या युद्धाभ्यासात, भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व INS रणविजय ही गाइडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका आणि या जहाजावरील हेलीकॉप्टर, ASW कर्वेट INS किल्तान आणि कोर्वेट INS कोरा या क्षेपणास्त्र संहारक युद्धनौका, तसेच P8I हे नौदलाचे लांब टप्प्याचे गस्त घालणारे विमान यांनी केले.
🔴पार्श्वभूमी...
☑️1994 साली सुरु झालेला SIMBEX नौ-युद्धाभ्यास भारतीय नौदलाच्या इतर कोणत्याही परकीय नौदलासोबत चालणाऱ्या द्विपक्षीय सराव सत्रापैकी सर्वात जास्त काळ आणि सातत्याने सुरू असलेला युद्धाभ्यास आहे.
☑️एकूण भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबधांमध्ये द्विपक्षीय संरक्षणविषयक संबंधाना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये पारंपारिक लष्करी देवाणघेवाण ते HADR व सायबर सुरक्षा या स्तरापर्यंत, परस्पर सहकार्य केले जाते. दोनही नौदलांना परस्परांच्या सागरी माहिती फ्युजन केंद्रात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पाणबुडी बचावकार्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा करारही दोनही नौदलांनी नुकताच केला आहे.
🅾️सिंगापूर देश..
☑️सिंगापूर हे मले द्वीपकल्पाच्या दक्षिणेस, हिंद महासागरात आग्नेय आशियातील श्रीमंत व पर्यटकांचे आकर्षण असलेले एक द्वीप प्रजासत्ताक आहे. सिंगापूर सिटी हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. सिंगापूर डॉलर हे देशाचे अधिकृत चलन आहे.
No comments:
Post a Comment