🔰सपूर्ण भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी HDFC बँक आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
🔰कराराच्या अंतर्गत, HDFC बँक विशेषतः MSME उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी बँक विविध योजना आखणार आहे. तसेच प्रकल्पांसाठी स्थानिक पातळीवर आणि भारतातील इतर महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये समर्थन वाढविणार. या भागीदारीने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने भारताच्या वाढत्या MSME क्षेत्राला चालना देण्यास मदत होईल.
🔰राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) मर्यादित ही एक मिनीरत्न सरकारी संस्था आहे. त्याची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSMEs) 1955 साली केली.
🔰HDFC बँक लिमिटेड ही मुंबई येथे मुख्यालय असलेली एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय कंपनी आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत ती भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरत आहे.
No comments:
Post a Comment