Saturday, 11 September 2021

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश



🔸जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. 


🔹तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.


🔸 द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 


🔹सरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. 


🔸यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता


🔹भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे.


🔸 दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. 


🔹मबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे.


🔸 तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...